या योजनेअंतर्गत हरभरा आणि ज्वारी पिकांसाठी बियाणे अनुदान दर निश्चित करण्यात आले आहेत. हरभरा 10 वर्षाआतील वाणाकरिता 2073.4 क्विंटल बियाण्यांचे वितरण 50 रुपये प्रति किलो अनुदान दराने करण्यात येणार आहे. तर 10 वर्षांवरील वाणाकरिता 25 रुपये प्रति किलो अनुदान असेल. तसेच ज्वारी 10 वर्षांत्रातील वाणाकरिता 40 क्विंटल बियाणे 30 रुपये प्रति किलो अनुदान दराने, आणि 10 वर्षांवरील वाणाकरिता 170 क्चेिंटल बियाणे 15 रुपये प्रति किलो अनुदान दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बियाणे वितरण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) या तत्वावर करण्यात येईल. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व कृभको या संस्थांच्या अधिकृत वितरकांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, सातबारा उतारा व आधार कार्ड असणे आवश्यक असून, एका शेतकऱ्याला केवळ 1 हेक्टर मयदितच प्रमाणित बियाण्याचा लाभ देण्यात येईल.