बावनबीर ता.संग्रामपूर हिंदू समाजाच्या जगदंबा नवरात्रीउत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये काही समाजकटकांनी दगडफेक केली या घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्ष गावात भेट देऊन आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला.
हिंदू धर्मातील सन उत्सवाच्या मिरवणूकीवर आणि हिंदू नागरिकांवर झालेली ही दगडपेक ही एकतर्फी होती. गावामध्ये जे समाजकंटक जे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर व तात्काळ कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
तसेच गावातील कत्तलखाना तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील शितला माता मंदिर परिसर अन्य ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेवून प्रत्यक्ष आढावा घेतला. यापुढे अशा घटना होणार नाही यांची कटाक्षाने काळजी पोलीस विभागाने घ्यावी. नागरिकांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी माझ्यासह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.श्रेणिक लोढा,ठाणेदार चंद्रकांत पाटील आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.