शासकीय बालगृहात लसीकरण शिबिर संपन्न.


शासकीय बालगृहात लसीकरण शिबिर संपन्न.                   

राजू बडेरे 
 (मुख्य संपादक)

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि आरोग्य विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 17सप्टेंबर  ते 2 ऑक्टोबर या सेवा पंधरवाडा अंतर्गत दिनांक 20 सप्टेंबर रोजी शासकीय बालगृह येतील बालके यांचे करिता गोवर आणि रुबेला लसीकरण शिबिर घेण्यात आले तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षिका संगीता जाधव यांनी बालकांना सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श याबाबत मार्गदर्शन केले तर जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे समुपदेशक ज्योती गवई यांनी वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत संवाद साधला या वेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनील लाडूलकर, एन्करेज एज्युकेशन फाउंडेशन चे अध्यक्ष महेंद्र गणोदे, चाईल्ड हेल्प लाईन च्या शरयू तळेगाकर विपला फाउंडेशन च्या अस्मिता धर्माले, शासकीय बालगृह चे सुरक्षा रक्षक प्रतीक साबळे, रोहन गुलधे उपस्थित होते