श्री संस्थानकडून पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाखाची मदत
शेगांव : यावर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप मोठे नुकसान झालेले असून अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन राज्यातील पुरामुळे बाधीत झालेल्या पुरपिडीतांसाठी शेगांव श्री गजानन महाराज संस्थान या न्यासाचे वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. 1 कोटी 11 लाखाचा सहयोग निधी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस यांना दि.27/09/2025 रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला आहे.