बजाज अलायन्स कडुन फळपिक विमाधारकाची फसवणुक

बजाज अलायन्स कडुन फळपिक विमाधारकाची फसवणुक

राजू विजय बडेरे 
(मुख्य संपादक)

पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करता फळ पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबवली जात आहे.पारंपारिक शेती पध्दतीपेक्षा फळबागांचे महत्व अधिक वाढत आहे. हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार फळांची लागवड केली जाते.जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करता फळ पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्या कडुन विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रिमीयमची रक्कम जमा करून विमा मंजुर झाल्यास शेतकऱ्याचे अर्ज रिजेक्ट करण्याचा प्रकार बजाज फळ पिक विमा कंपणीकडून होत आहे . संग्रामपुर तालुक्या सोनाळा महसुल मंडळातील शेतकऱ्यानी नोव्हेबर महिन्यात संत्रा आंबिया बहाराचा हेक्टरी ५ हजार रुपयाची रक्कम भरून फळ पिक विमा काढला होतो . १ डिसेंबर पासुन ३१ मे पर्यंत संत्रा फळपिकाचे चार वेगवेगळ ट्रिगर लागु होते . सोनाळा मंडळात चारही ट्रिगर मंजुर झाल्याने शेतकऱ्याना हेक्टरी १ लाख रुपयाचा विमा मंजुर झाला आहे . आणि केळी पिकासाठी हेक्टरी ७५ हजार रुपये मंजुर झाले आहेत .नोव्हेंबर पासुन शेतकऱ्यानी विमा अर्ज भरले असताना ट्रिगरची आकडेवारी घेवून मंजुर झालेली रक्कम शेतकऱ्याना न मिळावी यासाठी नोव्हेंबर पासुन दाखल केलेले अर्जाची पळताळणी विमा कंपनी कडून ऑगष्ट महिन्यात करून वेगवेगळे निकष लावून शेतकऱ्याचे संत्रा आणि केळी पिकाचे अर्ज रिजेक्ट करण्याचा प्रकार विमा कंपनीकडून होत आहेत . शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे . अजे नामंजुर झाल्याने ५ हजार रुपये वाचा गेले आणि मिळणारी मदत पण गेली . शेतकऱ्या ना वेगवेगळ्या निकषा विषयी माहिती नसते . एक दोन वर्षात शाशन निर्णयाबरोबर निकषही बदलतात त्यामुळे विमा भरतेवेळी पोर्टल अपडेट करणे विमा कंपणीची जबाबदारी आहे . फळ पिक विन्यासाठी ४ हेक्टर च्या क्षेत्राच्या वर क्षेत्र चालत नाही तर पोर्टलने विमा घ्यायला नाही पाहिजेत त्यानंतर एकाच क्षेत्रावर पुन्हा विमा काढता येवू नये . हे बदल पोर्टल द्वारे व्हायला पाहीजात यामधे शेतकरी वर्गात एवढी माहिती नसते . मात्र मंजुर झालेली रक्कम हडप करण्यासाठी शाशन निर्णयाचे निकष लावून शेतकऱ्याची फसवणुक बजाज विमा कंपणी करीत आहेत . याकडे राज्यसकारने लक्ष देवून रिजेक्ट केलेले अर्ज तात्काळ मंजुर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत . प्रतिक्रिया : संत्रा आंबिया बहारामधे विमा कंपन्या शेतकऱ्याचा अर्जावर निकषाची चाळणी लावून मदतीपासुन वंचीत ठेवत आहे . निकषा प्रमाणे ट्रिगर संपल्यानतर ४५ दिवसाच्या आत मंजुर पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्याची तरतुद आहे . नाही दिल्यास १२ टक्के व्याजासह मदतीची तरतुद आहे . मात्र वर्षभराचा कालावधी संपते पण शेतकऱ्याना विमा कंपनी कडून मदत मिळत नाही . मात्र विमा कंपण्यावर कोणतीची कारवाई होत नाही . निकष फक्त शेतकऱ्यावर लादल्या जातात ही कृषीप्रधान देशाची शोकांतीका आहे.