जळगाव जामोद येथील शेतकऱ्याचा मुलगा झाला विद्युत सहाय्यक

जळगाव जामोद येथील शेतकऱ्याचा मुलगा झाला विद्युत सहाय्यक

राजू विजय बडेरे 
(मुख्य संपादक)

जळगाव जामोद : येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या अमोल नारायण शिरसागर यांची महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. अमोल शिरसागर अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. १० वी पास झाल्यावर अमोल याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था संग्रामपूर येथे वीजतंत्री या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. आयटीआय करत असताना त्याने पेपर वाटण्याचे आणि डॉ. आदित्य जाधव यांच्या दवाखान्यात रुग्ण नोंदीचे काम केले. त्याच्या वडिलांनी महाराष्ट्र होमगार्ड मध्ये ३४ वर्ष सेवा दिली आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्ष होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले आई-वडील, डॉ. जाधव आणि महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ असलेले अविनाश गिरी यांना दिले आहे.