गाडेगाव खुर्द चे सुपुत्र देशसेवेहून परत आल्याने गावभर उत्सव साजरा.

गाडेगाव खुर्द चे सुपुत्र देशसेवेहून परत आल्याने गावभर उत्सव साजरा.


राजू विजय बडेरे 
(मुख्य संपादक)

गाडेगाव खुर्द नगरीचे सुपुत्र वीर जवान अमित कुमार चंदगोळे हे भारतीय सेनेमध्ये प्रदीर्घ देश सेवा करून सेवानिवृत्त झाले त्यांचे आज दी.3.ऑगस्ट रोजी त्यांची जन्म भूमी गाडेगाव खुर्द नगरीमध्ये आगमन प्रसंगी गावातील रस्ते रांगोळ्यांनी सजले होते गावात उत्सवाचे आनंदाचे वातावरण होते भारत मातेचे वीर सुपुत्र अमित कुमार चंदगोळे हे गावात येणार आहेत हे माहिती होतच गावाकऱ्यांनी उस्थात स्वागतांसाठी विशेष तयारी केली होती गावात दाखल होतच मोठ्या उस्थात आनंदात त्यांची गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या वेळी "माझी सैनिक वसंत मिरगे मानेगाव"
यांनी शाल श्रीफल पुष्गगुछ देऊन भारत मातेचे वीर सुपुत्र अमित कुमार चंदगोळे यांचे स्वॉगत केले या वेळी गावातील नगरीक् मोठ्या संख्येने उपस्थित होते.