राजू विजय बडेरे
(मुख्य संपादक)
जळगाव जामोद तालुक्यात दरवर्षी पेक्षा ह्यावर्षी सोयाबीन व तूर पिकाची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सुरुवाती पासूनच पाऊस कमी प्रमाणात झाला असून तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आणि शेतकरी पावसासाठी कासावीस होवून चिंतातर झाला होता. परंतु गेल्या चार दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात दररोज रिमझिम व पिका लायक दमदार पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.जळगाव जामोद तालुक्यात खरीप पिक हंगामात सुरुवातीला दमदार पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, यामध्ये ह्यावर्षी सोयाबीन व तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली, काही दिवस रिम झिम पाऊस होवून पिके अंकुरली होती. शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी डवरणी, फवारणी, खुरपणी, निंदन अंतराचे पिकात वखरणी करून आतंरमशागत केली होती. परंतु मध्यंतरी दोन-तीन पावसाने दडी मारल्याने पिके पिवळी पडून सुकू लागली होती त्याामुळे शेतकरी चिंतातुर होवून कासावीस झाला होता. शेवटी निसर्गाने कृपा करून गेल्या चार दिवसापासून दररोज रिमझिम पाऊस सुरू असल्याने सर्वच पिकांना जीवदान मिळाले. गेल्या तीन दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही. या रिमझिम पावसाम ळे इतर कामे इतर मशागतीची कामे खोळंबली आहेत.