भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान आमदार श्री.डॉ. संजयजी कुटे साहेब यांचे स्वागत

भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान आमदार श्री.डॉ. संजयजी कुटे साहेब यांचे स्वागत

राजु विजय बडेरे 
(मुख्य संपादक)


राज्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनांतर्गत दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात १००० रुपयांची वाढ व एकूण अनुदान २,५०० रुपयांचे केल्याबद्दल आज दिनांक २६/०७/२०२५ रोजी भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा बुलढाणा विभाग (खामगाव) तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान आमदार श्री.डॉ. संजयजी कुटे साहेब यांचे व त्यांच्यामार्फत संपूर्ण महायुती सरकारचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.त्यासाठी आज भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा बुलढाणा जिल्हाअध्यक्ष मा.अंबादासजी निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.संतोषजी चिकटे, जिल्हा सरचिटणीस मा.श्री.चंद्रकांतजी शिंदे,शहराध्यक्ष मा.सुधीरजी इंगळे, संग्रामपूर तालुकाध्यक्ष मा.श्री.श्रीकृष्णजी वडनेरकर, सर्वेश हातेकर तसेच भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा बुलढाणा मा.श्री.राजु विजय बडेरे (मीडिया प्रभारी) तसेच बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.