खरीप हंगाम 2024 मधील प्रलंबित पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा! शेतकरी बंधूंना मोठा दिलासा
राजु विजय बडेरे
(मुक्त संपादक)
खरीप हंगाम २०२४ अंतर्गत अनेक महिन्यांपासून तांत्रिक कारणाने प्रलंबित असलेला पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तब्बल ६३५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु आहे. या अंतर्गत जळगाव जामोदसाठी - 27 कोटी रुपये, संग्रामपूर - 30 कोटी रुपये, शेगाव तालुक्यासाठी - ३१ कोटी रुपये मंजूर असून लवकरच हि रक्कम विमा धारक शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत असून लवकरच हि रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा विश्वास आहे.कष्टाच्या पिकाला अवकाळी पावसाने, कीडरोगांनी आणि निसर्गाच्या लहरीने जबरदस्त फटका दिला होता. शासन दरबारी पाठपुरावा करून देखील अनेक महिने या विम्याची वाट पाहावी लागत होती. परंतु शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहत, सातत्याने पाठपुरावा करून हा निर्णय मार्गी लावण्यात आला आहे.ही योजना फक्त आकड्यांपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्याच्या हक्काचा पैसा थेट त्याच्या खात्यात जमा होईपर्यंत माझा प्रामाणिक पाठपुरावा हा सुरूच राहणार आहे.