दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना मोफत साहित्य वाटपसाठी तपासणी शिबिराचे आयोजन
मुख्य संपादक
राजू विजय बडेरे
दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप नियोजन बाबत समाज कल्याण विभाग बुलढाणा मार्फत महात्मा ज्योतिबा फुले सभागृह पंचायत समिती जळगाव जामोद येथे ३० मे रोजी शुक्रवारला सकाळी १० वाजेपासून मोफत तपासणी व नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, या नोंदणी कार्यक्रमास दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप मोरे गटविकास अधिकारी यांनी केले आहे. सविस्तर असे की दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरिक याना कृत्रिम अवयव व इतर बाबी साठी नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर शिबीरामध्ये अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेबल पाल्सी, कर्णबधीर तसेच पूर्णतः अंध दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या सहायक साहित्याचे निश्चिती करणेसाठी तपासणी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभाग व सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालययांचे वतीने एडीप व आर की वाय अंतर्गतसदर नोंदणी नंतर साहित्य वितरीत करण्याची कार्यवाही होणार आहे. त्यासाठी दिव्यांगांची तपासणी होणे अनिवार्य असल्यामुळे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभमिळणेसाठी दिव्यांगांनी अपंगत्व दर्शविणारे एक फोटो, आधार कार्ड,
युडीआय डी कार्ड किंवा अपंगत्वं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला रू २२,५०० पेक्षा कमी असावा. तसेच जेष्ठ नागरीक 60 वर्ष वरील असलेले याना एक फोटो, आधारकार्ड, १५००० रू पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. वरील योजनेअंतर्गत ३ वर्षांपूर्वी लाभ घेतला असल्यास ती व्यक्ती पात्र ठरणार आहे. एडीप स्कीम अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना आधा तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल, कुबड्या, वाँकींग स्टिक, सीपी चेअर, बिटीई श्रवणयंत्र, ब्रेल साहित्य, कृत्रिम अवयव, कैलीपर इत्यादी साहित्य देण्यात येणार असून जेष्ठ नागरीकांना व्हिल चेअर, कमोडसह व्हिल चेअर, काठी, पॉडसाहित्य, श्रवणयंत्र, ग्रीवा कॉलर, गुडघा ब्रेस व इतर सहायक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. उत्पन्नाचा दाखला सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नगराध्यक्ष यांचा ग्राहय धरण्यात येणार आहे. तरी जळगांव जामोद परिसरातील दिव्यांग तथा जेष्ठ नागरिकांनी लाभघेण्याचे आवाहन गट विकास अधिकारी मा. संदीपकुमार मोरे यांनी केले आहे.