सायखेड येथे शेतातील बोर मशीन व पाईप लंपास
कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून जवळच असलेल्या आदिवासी बहुल भागातील सायखेड येथे गट नंबर 360 मधील शेतकरी भारत भिका घट्टे यांच्या शेतातून रात्रीच्या सुमारास शेतातील बोर मशीन व पाईप अज्ञात चोरट्याने लंपास केले असून शेतकऱ्याने अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. सध्या सर्व शेतामध्ये लवकरच पेरणी सुरू होतील अशातच या शेतकऱ्याच्या शेतात चोरी झाली. अशी माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास घट्टे यांनी दिली आहे.