दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्त सोनाळा येथे कळकळीत बंद

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्त सोनाळा येथे कळकळीत बंद

तालुका प्रतिनिधी संग्रामपूर

पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्याची ही घटना मानवतेला काडीमा फासणारी आहे. हा हल्ला देशाच्या समता बंधुता व एकात्मतेला बाधा पोहोचविणारा आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यात येत असून सरकारने सर्व पिढीत आणि त्यांच्या कुटुंबांना आवश्यक ती मदत करावी. या भ्याड हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या निशेषार्थ संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आज दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजे पर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे . यामध्ये सर्व व्यापारी, व समस्त सोनाळा गावकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत.