७८ व्या वर्धापन दिनी स्मशानभूमीत स्वच्छतेचा दिव्य यज्ञ! निमा व जेसीआय जळगाव जामोदच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता उपक्रम

७८ व्या वर्धापन दिनी स्मशानभूमीत स्वच्छतेचा दिव्य यज्ञ! निमा व जेसीआय जळगाव जामोदच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता उपक्रम

राजु विजय बडेरे 
(मुख्य संपादक)

आजचा दिवस जळगाव जामोद शहरासाठी एक प्रेरणादायी पर्वणी ठरला. नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) जळगाव जामोद शाखेच्या ७७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, जेसीआय जळगाव जामोदच्या सहकार्याने शहराच्या सर्वात जुन्या खेर्डावेस, सुनगाव रोडवरील स्मशानभूमीत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमामागे होती एक सुंदर संकल्पना – "जिथे अंत होतो, तिथूनच नवसूर्योदय सुरू होऊ शकतो!"

या अभियानाचं नेतृत्व *NIMA चे अध्यक्ष* डॉ. मंगेश विजय बडेरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. *सचिव* डॉ वैभव खिरोडकार आणि *कोषाध्यक्ष* डॉ. अतुल अंबडकर यांच्या व्यवस्थापनाने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरक ठरला.

तसंच जेसीआय जळगाव जामोदचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित मिश्रा, सचिव जयंत तायडे, आणि कोषाध्यक्ष अमरसिंह राजपूत यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम सामाजिक एकतेचा आणि सकारात्मक बदलांचा आदर्श निर्माण करणारा ठरला.

सकाळी ७ वाजता सुरु झालेल्या या उपक्रमात अनेक डॉक्टर्स, समाजसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे डॉ. अतुल उमाळे, डॉ. श्रीकांत अढाव, ईश्वर वाघ, प्रवीण भौंढोकार, आणि विवेक ढोकने यांचाही मोलाचा सहभाग या अभियानात दिसून आला.

स्वतः आपल्या हातांनी झाडू घेऊन, कचरा गोळा करत, झाडांची निगा राखत – प्रत्येक सहभागी सदस्याने श्रमदान करत समाजासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला. स्मशानभूमी ही केवळ अंत्यसंस्काराची जागा नसून, ती आपल्या संस्कृतीचा आरसा आहे, हे या उपक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाले.

या कार्यक्रमातून एक स्पष्ट संदेश दिला गेला – स्वच्छता ही केवळ गरज नाही, तर आपल्या संस्कारांची साक्ष आहे.

आजचा दिवस केवळ एक उपक्रम नव्हता, तर तो जळगाव जामोदच्या सामाजिक एकतेचा, सद्भावनेचा आणि सार्वजनिक जागरूकतेचा झगमगता दीप होता.