खामगाव नांदुरा राष्टीय महामार्गावर झाला भीषण अपघात 3 ठार 16 गंभीर

खामगाव नांदुरा राष्टीय महामार्गावर झाला भीषण अपघात 3 ठार 16 गंभीर                       
राजु विजय बडेरे 
(मुख्य संपादक)            


दि.15 एप्रिल रोजी सकाळी 7.15 दरम्यान खामगाव कडून येणारी मध्यप्रदेश गुप्ता ट्रॅव्हल्स बस नांदुरा कडे जात असताना नांदुरा कडून विटानी भरलेला टिप्पर रोड वरील कट मधून दुसरीकडे जाताना बस ला अपघात झाला बस मधील 16 प्रवाशी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारकरिता खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता काहींना अकोला येथे पाठविण्यात आले आहे परंतु टिप्पर मधील 3जण जागेवरच मृत्यू आवास्तेत आढळले आहेत अपघात एवढा भीषण होता टिप्पर व बस ला वेगळे करण्याकरिता जे. सी. बी. वाहनचा उपयोग घ्यावा लागला आमसरी येथील गावाकरी लोकांनी अपघात ग्रस्त लोकांना बाहेर काढण्यात मदत केली आता पर्यंत पो. स्टे.जळंब गुन्ह्यांची नोंद झाली नाही.मृतकाचे नातेवाईक याचे कडून त्रकार दाखल केल्या नंतर गुन्हा दाखल केला जाईल.